”आदिवासी हृदयसम्राट” माननीय मधुकर पिचड साहेब

Madhukar Kashinath Pichad | Biography | Age | मधुकर काशिनाथ पिचड

visitakole.com/madhukar pichad/मधुकर पिचड

महाराष्ट्रातील जेष्ठ आदिवासी नेते, आदिवासी समाजाचा लढवय्या बापमाणूस, जलनायक, लोकनेता तथा ”आदिवासी हृदयसम्राट” अशी ओळख असलेले माननीय मधुकररावजी पिचड साहेब यांचे दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी नाशिक येथे रुग्णालयात ब्रेन स्ट्रोक या आजाराने दुःखद निधन झाले.

पिचड साहेबांच्या निधनाने संपूर्ण अकोले तालुक्यावर शोककळा पसरली आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. आदिवासी लोकनेता निसर्गात विलिन झाला.

अकोले विधानसभा मतदार संघातून तब्बल सात वेळा माननीय पिचड साहेब आमदार म्हणून निवडून आले होते. अकोले तालुक्याच्या विकासात रस्ते , विज, सिचंन व्यवस्था लहाण मोठी धरणे, बंधारे, तालुक्यात शैक्षणिक संस्था, आश्रम शाळा उभारणी यामध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे.

माननीय पिचड साहेबांनी राजकारणाची सुरवात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षातून केली. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष स्थापन झाल्यानंतर या पक्षाच्या स्थापनेपासूनच पिचड साहेब शरद पवारांसोबत होते.

अकोले तालुक्याची कामधेनू म्हणून ओळखला जाणारा अकोले तालुक्यातील पहिला सहकारी साखर कारखाना “अगस्ति सहकारी साखर कारखाना” सुरू करण्यात त्यांचे महत्वाचे योगदान आहे. १९९३ साली हा कारखाना स्थापन करण्यात आला. पिचड साहेब या कारखाण्याचे संस्थापक अध्यक्ष होते.

माननीय मधुकररावजी पिचड साहेब यांच्या निधनाने अकोले तालुक्याच्या राजकारण आणि समाजकारणामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

‍माननीय मधुकररावजी पिचड साहेब यांचा जीवन प्रवास

जन्मगाव : राजूर, ता. अकोल, जिल्हा अहिल्यानगर(अहमदनगर).

जन्मतारीख : १ जून १९४१.

वडील : काशिनाथ भिकाजी पिचड (शिक्षक).

आई : कमलाबाई पिचड.

Madhukar Kashinath Pichad Family | Wife | Education
visitakole.com/madhukar pichad family
photo from facebook

 पत्नी : हेमलताताई मधुकरराव पिचड (आदर्श सरपंच राजूर)

राजूर गावच्या सरपंच म्हणून काम करताना त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

मुले
हेमंत मधुकर पिचड, वैभव मधुकर पिचड, कै.किरण मधुकर पिचड, कै.जितेंद्र मधुकर पिचड

शिक्षण : प्राथमिक शिक्षण राजूर येथे

माध्यमिक शिक्षण संगमनेर इयत्ता १० वी १९५९

पदवी बी. ए. फर्ग्युसन महाविद्यालय पुणे, पुणे विद्यापीठ.

राजकीय प्रवास : पुणे येथे महाविद्यालयीन जीवनात राष्ट्र सेवा दलाशी संबंध

महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी निवडीसाठी होणाऱ्या निवडणूकांत सहभाग घेतला.

पुणे येथे त्यांचा विचारवंत आणि स्वातंत्र्यसैनिक प्राध्यापक ग. प.  प्रधान यांच्याशी संपर्क आला आणि त्यांनी राजकारण आणि समाजकार्यात काम करण्याची प्रेरणा मिळाली.

आदिवासी शेतकऱ्यांचे हाल आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी १९६१ साली लढा उभारणाचे काम केले.

अकोले तालुक्यातील सहकारी तत्वावर पहिली दूध संस्था राजूर येथे सुरु केली.

आदिवासी समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अकोले तालूक्यात आदिवासी उन्नती सेवा मंडळाची स्थापना त्यांनी केली. या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून अनेक मध्यमिक शाळा, आश्रमशाळा, वसतिगृह चालवले जात आहेत.

अकोले तालुक्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारसरणी रूजवण्यात आणि पक्ष वाढवण्यात पिचड साहेबांची महत्वाची भूमिका होती.

१९७२ साली अकोले तालुक्यातून पहिल्यांदा अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले.

१९७२ सालीच अकोले पंचायत ‍ समितीचे सभापती म्हणून निवडून आले. १९७२ ते १९८० पर्यंत त्यानी सभापती पदाची जबाबदारी पार पाडली.

१९८० साली  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(आय) या पक्षाकडून अकोले विधानसभेचे तिकिट मिळाले अन् निवडणूक लढवली. विजयी झाले. आमदार म्हणून  पहिल्यांदा निवडून आले

१९८० ते १९८५ या कालीवधीत महाराष्ट्र विधानसभेच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख म्हणून योग्य प्रकारे जबाबदारी पार पाडली.

१९८५ साली  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(आय) या पक्षाकडून अकोले विधानसभेची निवडणूक लढवली. आमदार म्हणून  दुसऱ्यांदा निवडून आले.

visitakole.com-pichad-saheb-shapath-vidhi-oath-ceremony

१९८५ ते १९९० या कालावधीत मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांच्या मंत्रीमंडळामध्ये जून १९८५ ते १९८६ दरम्यान राज्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडली.

जून १९८८ ते मार्च १९९० या दरम्यान कृषी विभाग, रोजगार हमी योजना, दुग्धविकास, आदिवासी विकास विभाग आणि पशुसंर्वधन  विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम केले.

१९९०  साली  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(आय) या पक्षाकडून अकोले विधानसभेची निवडणूक लढवली. आमदार म्हणून तिसऱ्यांदा निवडून आले.

जून १९९१ ते नोव्हेंबर १९९६ या कालावधी दरम्यान आदिवासी विकास विभाग आणि वन व पर्यावरण मंत्री म्हणून काम केले.

मार्च १९९३ ते सप्टेंबर १९९४ या कालावधीत आदिवासी विकास विभागासह पशुसंर्वधन व दुग्ध विभाग आणि मत्स्यविभागाचे मंत्री म्हणून काम केले.

१९९५ साली  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस(आय) या पक्षाकडून अकोले विधानसभेची निवडणूक लढवली. आमदार म्हणून चौथ्यांदा निवडून आले.

visitakole.com-madhukar-pichad-मधुकर-पिचड
photo from fabebook

मार्च १९९५ ते जुलै १९९९ या दरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काम केले.

१९९९ साली  राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून अकोले विधानसभेची निवडणूक लढवली. आमदार म्हणून पाचव्यांदा निवडून आले.

ऑगस्ट १९९९ ते ऑगस्ट २००४ या कालावधीत आदिवासी विकास मंत्री म्हणून काम केले.

ऑक्टोबर २००१ सालामध्ये अखिल भारतीय आदिवासी विकास परीषदेवर राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून निवड.

२००४ साली  राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून अकोले विधानसभेची निवडणूक लढवली. आमदार म्हणून सहाव्यांदा निवडून आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशअध्यक्ष म्हणून काम केले.

२००९ साली  राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून अकोले विधानसभेची निवडणूक लढवली. आमदार म्हणून सातव्यांदा निवडून आले.

२०१४ साली अकोले विधानसभेच्या निवडणूकीत पिचड साहेबांनी स्वत:उभे न राहता आपला मुलगा मा.वैभव पिचड यांना उभे केले आणि निवडून आणले.

२०१९ साली माननीय पिचड साहेबांनी आपले पुत्र वैभव पिचड यांच्या सह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. २०१९ सालाची अकोले विधानसभेची निवडणूक वैभव मधुकर पिचड यांनी भारतीय जनता पक्षाकडून लढवली. पराभूत झाले.

Leave a Comment

error: Content is protected !!