कळसुबाई ट्रेक | Kalsubai Trek भाग १

नमस्कार मित्रांनो ….

आज आपण माहिती पाहणार आहोत सह्याद्रीच्या रांगेतील आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असणाऱ्या कळसुबाई ची

भारतामधील काही प्रमुख पर्वतांपैकी कळसुबाई पर्वत (kalsubai mountain) एक आहे. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगातील सर्वोच्च शिखर आहे. हे शिखर कळसूबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यात (Kalsubai-Harishchandragad Wildlife Sanctuary) स्थित आहे.

visitakole.com kalsubai peak hight

कळसूबाई शिखर समुद्रसपाटीपासून ५४०० फूट उंचीवर आहे( kalsubai height in 1646 meters or 5400 feet). हे शिखर एक लोकप्रिय ट्रेकिंगचे ठिकाण आहे. आजूबाजूच्या परिसराची सुंदर दृश्ये शिखरावरून पहायला मिळतात.सर्व ट्रेक प्रेमींसाठी हे एक परिपूर्ण ठिकाण आहे.

visitakole.com-kalsubai-trek-last-point
कळसुबाई शिखरावरील शेवटच्या टप्प्याचे दृश्य I View Of the Final Stage on the Kalsubai Peak I Kalsubai Trek

 

सगळयाच भटक्यांचं स्वप्न असणारा ट्रेक किंवा आव्हान देणार शिखर….महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसुबाई शिखर (Kalsubai Peak the Everest of Maharashtra). ज्यांना आव्हानात्मक ट्रेक करायला आवडतात त्यांच्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. हा ट्रेक सुंदर हिरव्यागार  निसर्गसौंदर्यांमधून जातो आणि अनेक धबधबे हि पावसाळ्यात पाहायला मिळतात.

कळसूबाई शिखरावर जाण्याचा ट्रेक मध्यम-कठीण मानला जातो आणि तो एका दिवसात पूर्ण करता येतो. हा ट्रेक तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल. सर्वोच्च शिखर सर करण्यासाठी ट्रेकचा रोमांच अनुभवायचा असेल तर तुम्ही या ठिकाणाला भेट द्यायलाच हवी.

कळसुबाई शिखर नक्की आहे तरी कस? | How is Kalsubai peak?
कळसुबाई शिखराचा भूगोल | Geography of Kalsubai Peak

कळसुबाई पर्वत(Kalsubai peak) हा दख्खण पठाराचा एक भाग आहे. बारी हे शिखराच्या पायथ्याशी असणार गाव (base village). हे गाव कोळी महादेव या आदिवासी लोक जमातीचे असून शेतीप्रधान गाव आहे. अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील अकोले तालुक्यात हे शिखर आहे.

कळसूबाई शिखर ट्रेकची वाट बारी गावातून सुरू होते. ट्रेकच्या सुरुवातीपासूनच आपण शेतराणातून चालत जाते. या शेतजमिनीत स्थानिक शेतकरी इंद्रायणी, वाडा कोलम,१००८,सव्वाशे नंबर दफ्तरी यांसारख्या विविध प्रकारची भात शेती करतात. गहू आणि हरभरा हि पिकेही  घेतली जातात. या भागात काही ठिकाणी उंच चढण आहे. समुद्र सपाटीपासून या शिखराची उंची १६४६ (kalsubai peak height) मीटर इतकी आहे (फुटात ५ हजार ४०० फूट).

हे शिखर पूर्व पश्चिम असे पसरलेले असून पश्चिम घाटाच्या उजव्या बाजूला विलीन होते. कळसुबाई शिखराच्या दक्षिण दिशेला अकोले तालुका(akole taluka) वसलेला आहे तर उत्तरेला नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका आहे.

कळसुबाई शिखराचे हवामान | Kalsubai Peak Weather

या ठिकाणचे हवामान हे उष्ण अर्ध शुष्क प्रकारचे असुन येथील तापमान हे सरासरी १९ ते ३३ अंश सेल्सिअस इतके असते. उन्हाळ्यातील एप्रिल आणि मे महिन्यात इथे सर्वात उष्ण तापमान असते, त्यावेळचे तापमान ४५ अंश सेल्सियस पर्यंत असते.

हिवाळ्यामध्ये इथे खूप थंडी असते, त्यावेळचे तापमान १० अंश सेल्सिअस पर्यंत कमी होते आणि दिवसाचे तापमान  हे २६ अंश सेल्सियस पर्यंत असते. या प्रदेशात वार्षिक पर्जन्य हे सुमारे ७६३ मिमी इतके आहे.

शिखराचा इतिहास | माहिती | History of Kalsubai Peak

कळसुबाई(kalsubai) बददल आख्यायिका किंवा दंत कथा सांगितली जाते.

कळसुबाई हि या गावातील सून होती.. तिला औषधी वनस्पतींबद्दल खूप ज्ञान होते.. त्याचा वापर करून ती गावातील लोकांची सेवा करत असे. कालांतराने तिच्या मृत्यु नंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून शिखराला तिचे नाव दिले आणि आठवण म्हणून तिचे छोटे मंदिर बांधले.. स्थानिक आदिवासी लोकांची कळसुबाई(आई) हि कुलदैवत आहे … मनोभावे सर्वजण कळसुबाई ची पूजा अर्चना करतात .

प्राचीन काळी कळसू नावाची कोळ्याची एक मुलगी होती.  ती पाटलाच्या घरी काम करत होती ..पाटलाकडे काम करण्याच्या आधी कळसू ने पाटलाला दोन अटी  घातल्या होत्या …..पहिली अट अशी होती कि मी कधीही केर(कचरा ) काढणार नाही .. आणि दुसरी अट होती  मी भांडी  घासणार नाही ….परंतु एके दिवशी पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले होते…. पाटलाने नाईलाजाने कळसूला भांडी घासायला लावली …. त्यामुळे राग येऊन कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली .. आणि तिने तेथेच देह त्याग केला .. तोच कळसुबाई चा डोंगर.

कळसुबाई ट्रेकची सुरवात | Kalsubai Peak Trek

ट्रेक ला सुरवात केल्यावर बारी गावाच्या मागे एक ओढा लागतो. या ओढ्याला पावसाळ्यात पाणी असते. आजूबाजूचा परिसर हा पावसाळ्यात खुपच  मोहक असतो. अनेक लहान मोठे धब धबे आपले लक्ष वेधून घेतात. कळसुबाई ला जाणारी पायवाट हि चांगलीच मळलेली आहे.

visitakole.com kalsubai-trek-start

कळसुबाई च्या कथेला दंतकथा जरी म्हणत असले तरी पूर्वीपासून स्थानीक लोक कळसुबाई ला देवीचा अवतार मानतात. देवीची पूजा करायला आणि नवस फेडायला येणाऱ्या लोकांच्या गर्दीमुळे वाट रुळलेली आहे.हि वाट शेतानंतर डावीकडे वर जाते. पायवाट थोडी खडकाळ आहे. पुढे झाडांची चांगली सावली आहे. थोडेसे अंतर चालत गेल्यावर साधारणत: अर्ध्या तासात हि वाट आपल्याला शिखराच्या पहिल्या माचीवर असलेल्या कळसूबाईच्या मंदिराजवळ (kalsubai temple) घेवून जाते.

visitakole.com-khalchi-kalsubai-mandir
माचीवरील कळसुबाई मंदिर | Machi Kalsubai Temple
माचीवरील कळसुबाई मंदिर | Machi Kalsubai Temple

हे मंदिर जहागीरदारवाडीच्या हद्दीत आहे. हे मंदिर भक्कम दगडी जोत्यावर चौमोळी प्रकारात  बांधलेले आहे आणि कौलाचे छत आहे. या कौलारु मंदिराच्या आत जुन दगडी घुमट असलेले आणखी छोट राऊळ आहे. हे देऊळ ऑईलपेंट ने रंगवलेले आहे .. या देवळाच्या भिंतींवर जुने कोरीव काम पाहायला मिळते. या मंदिरात शेंदुराचा लेप दिलेल्या दोन मूर्ती आहेत. बाजूलाच छोटी देवळी (दिवा) आहे.  मंदिराच्या छताला नवसाच्या अनेक घंटा बांधलेल्या आहेत. इथे काही वीरस्तंभ आहेत.

कळसुबाई मंदिर वीर स्तंभ

कळसुबाई च्या दर्शनासाठी संपूर्ण शिखर चढणे अवघड वाटू लागलं तेंव्हा स्थानिकांनी हे मंदिर बांधल. स्थानिक लोक याला खालची कळसुबाई असे म्हणतात. ज्यांना शिखरावरच्या कळसुबाई ला जाणे शक्य नसते ते या मंदिरापर्यंत नक्कीच येऊन कळसुबाई चे दर्शन घेऊ शकतात.

विश्रांतीसाठी हे एक छान ठिकाण आहे. या ठिकाणापासून शिखर स्पष्ट दिसते आणि आपण शिखराच्या एकदम जवळ आल्याचा भास होतो, परंतु आपण किमान अडीच ते तीन  तास शिखरापासून दूर आहात.

visitakle.com-Kalsubai-praveshdwar

पुढे जाणारी पायवाट  हि बऱ्याच ठिकाणी चिन्हांकित केलेली आहे. त्यामुळे चुकण्याची अजिबात शक्यता नाही. इथून पुढे आपण चढत राहतो आणि हा परिसर खडकाळ आहे. अर्धा तास चालल्यावर झाडे कमी होतात अन आपण लोखंडी पायऱ्यांच्या पहिल्या शिडीजवळ पोहोचतो.

कळसुबाई ला जाताना वाटेत चार शिड्या बसवलेल्या आहेत. स्थानिक गावकरी दरवर्षी पावसाळ्यानंतर या शिड्यांची डागडुजी करतात. शिखरावरती चढताना दमछाक नक्कीच होते. वाटेत अवघड ठिकाणी वन विभाग आणि स्थानिक गावकऱ्यांनी लोखंडी बॅरिकेटस लावलेले आहेत.

कळसुबाई शिखरावरील अरुंद लोखंडी शिड्या चढण्याचा थरार..! | The thrill of climbing the narrow iron ladder To Kalsubai Peak
visitakole.com-kalsubai-trek-shidi-1
कळसुबाई माची मंदिरापासून थोडे पुढे गेल्यावर १ ली शिडी लागते

 

चार पाच अरुंद आणि उंच लोखंडी शिड्या असलेला भाग हा ट्रेकचा सर्वात आव्हानात्मक भाग आहे. शिड्या चढताना काळजी घ्या. पावसाळ्यात शिड्या निसरड्या झालेल्या असतात. काही शिड्यांच्या पायऱ्या तीव्र उताराच्या आणि उभ्या आहेत. या पायऱ्या अशा ठिकाणी आहेत जेथे खडकाचा भाग चढणे कठीण आहे.

visitakole.com-kalsubai-trek-shidi-2
कळसुबाई ट्रेक २ री शिडी

 

प्रत्येक शिडीच्या चढत्या पायवाटेने पुढे गेल्यावर काही ठिकाणी ओबड धोबड जमीन आहे.पावसाळ्यात बरेच ट्रेकर्स असतील तर वाट चिख्खलमय  झालेली असते. या ट्रेकची चढण आणि उतरण सारखीच आहे, त्यामुळे ट्रेकर्स आणि गावकऱ्यांची दुतर्फा ये जा चालू असते. या शिडीवर पावसाळ्यात ट्रेकिंग करणे अवघड असते.

visitakole.com-kalsubai-trek-shidi-3
कळसुबाई ट्रेक ३ री शिडी

 

शिखर चढत असताना तुम्हाला जोरदार वाऱ्याचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तुमच्या बॅगा सांभाळून ठेवा.

वाटेने चालताना काही ठिकाणी आपल्याला माकडांचे दर्शन होते.

तुमच्याकडेचे काही खाद्य पदार्थ तुम्ही माकडांना खायला टाकले तर ते पूर्णच टाका कारण आपण थोडे आपल्याजवळ ठेवले तर माकडे ते घेण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या बॅगा हि पळवू शकतात.

जवळपास ३ ते ४ तासांच्या चढाईनंतर आपण शिखरावर पोहोचलो असे तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही कड्या सारख्या भागात पोहोचता, तेव्हा अजून एक लहान शेवटची चढाई बाकी असते.

या शिखरावर जाण्यासाठी ची मुख्य वाट हि बारी या गावातूनच जाते ….(सध्या दोन नवीन पायवाट तयार करण्यात आलेल्या आहेत… एक वाट पेंडशेत (ता.अकोले) या गावातून जाते… तर दुसरी वाट हि पांजरे(ता.अकोले) या गावातून जाते.)

शेवटी वर पोहचल्यावर एक विहीर आहे.. तिच्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या विहरीत कायम पाणी असते. या विहरीच्या जवळ येई पर्यंत पाणी जपून वापरायला हवे.

visitakole.com-kalsubai-trek-kalsubai-shikhravaril-vihir

कारण कळसुबाई शिखरावर जाताना बारी गाव सोडल्यावर वरती पोहचेपर्यंत मधी कुठेही पिण्याच्या पाण्याची सोया नाही..  उन्हाळ्यात पाणी खूपच कमी असते.

अंतिम चढाई पुन्हा लोखंडी शिडीने करावी लागते. हि शिडी तीव्र उताराची अन उंच असल्यामुळे चढताना भीती वाटते, तेव्हा हळू हळू चढून जावे. शेवटची शिडी चढून गेल्यावर आपण शिखराच्या सर्वोच ठिकाणावर पोहचतो.

कळसुबाई मंदिर | Kalsubai Temple

शिखरावर कळसुबाई चे लहानसे सुंदर पवित्र मंदिर आहे. या मंदिरात अगदी तीन-चार माणसे बसू शकतील एवढी जागा आहे. मंदिरा बाहेर देवळी, त्रिशूळ, घंटा, हिरवा चुडा आणि भगवा झेंडा आहे….. आणि हो तिथे एक भक्कम साखळी हि आहे. हि साखळी शिखरावरून खाली मोकळी सोडलेली असते. जो हि साखळी एकट्याने ओढून वर आणेन त्याची मनोकामना देवी पुर्ण करते… अशी स्थानिकांची भावना आहे. देवी नवसाला पावते अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.

शिखरावरती कळसूबाईच्या मंदिरा सभोवताली सपाट जमीन आहे. कडेने सुरक्षेसाठी लोखंडी बॅरिकेट्स लावलेले आहेत. कळसूबाईच्या पवित्र मंदिरात आठवड्यातून दोन वेळा मंगळवार आणि गुरुवार पूजा केली जाते.

 

                                   कळसुबाई शिखरावरील कळसुबाई मंदिर I Kalsubai Temple

दरवर्षी अश्विन महिन्यात नवरात्रीमध्ये नऊ दिवस कळसुबाई मातेचे मोठा नवरात्रोत्सव भरतो. या काळात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतूल अनेक भाविक श्रद्धाळू देवीच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांना पूजा सामग्री खरेदी करण्यासाठी या काळात अनेक दुकाने असतात.

कळसूबाई मंदिर हे स्थानिक सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग असून ते महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील पर्यटकांना, ट्रेकर्स आणि निसर्ग अभ्यासकांना आकर्षित करते.

भाग २ वाचण्यासाठी इथे click करा
कळसुबाई शिखरावरून दिसणारी दृश्य | View From Kalsubai Peak

Leave a Comment

error: Content is protected !!