अकोले तालुका पर्यटन जबाबदार पर्यटन | Akole Taluka Tourism Responsible Tourism

अकोले तालुका फक्त पर्यटन नाही जबाबदार पर्यटन | Akole Taluka Not Just Tourism Responsible Tourism

नमस्कार मित्रांनो,‍

अकोले तालुक्यात आपले मनापासून स्वागत आहे आणि अकोलेकरसुद्धा आपल्या आदरातिथ्यासाठी सदैव तत्पर असतात. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला अकोले तालुका म्हणजे अहिल्यानगर(अहमदनगर) जिह्याचे ‘काश्मीरच’…

अनोख निसर्गसौंदर्य लाभलेल्या या तालुक्याला वैभवशाली, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाही  लाभला आहे. प्रवरा नदीच्या काठावर अकोले शहर वसलेले आहे. सह्याद्रीच्या कुशीत मोठ्या दिमाखाने उभे असलेले गड-किल्ले… शिल्पकलेने नटलेली प्राचीन मंदिरे याची साक्ष देत आहेत. निसर्गाच्या सानिध्यात  राहणारे येथील आदिवासी, त्यांचे लोकजीवन, परंपरा.. विविध लहान मोठी धरणे, जलविद्युत, पवनऊर्जा प्रकल्प येथील डोंगरद-यात, पठारांवर आकाराला आले आहेत.

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई, आशिया खंडातील दुसर्‍या क्रमांकांची असणारी सांदन दरी हे निसर्गाच अनोख आश्चर्य, थंड हवेचे ठीकाण म्हणून प्रसिद् असणारा भंडारदरा,सात वर्षातूनन एकदा फुलणारी कारवी, रंधा धबधबा, रतनगड, हरीश्चंद्रगड, पट्टाकील्ला, अगस्ती ऋषींचा आश्रम, विभिन्न प्रकारचे निसर्गाविष्कार…हे सारं वैभव आमच्या अकोले तालुक्यात पाहायला मिळते.

इथे  डोळ्याला सुखावणारी निसर्गसंपन्नता आहे. वर्षा ऋतूमध्ये तर येथील निसर्गसौंदर्य बहरुन येते. श्रावण महिन्यामध्ये तर येथील सौंदर्य पहाण्यासारखे असते. या निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल, ट्रेकिंग करायचे असेल, कँपींग करायचे असेल तर एकदा नक्की भेट द्या अकोले तालुक्याला.

अकोल्यात प्रदूषण विरहित स्वच्छ हवा आहे, सुंदर निसर्ग आहे. या निसर्गाला आपल्यालाच जपायच आहे, आपण अकोल्याला यावे, पुन्हा पुन्हा यावे, इथल्या पर्यटन वैभवाचा आनंद घ्यावा पण एका शिस्तप्रिय वातावरणात. एक जबाबदार पर्यटक कधीच कचरा करणार नाही. वारसा स्थळांवर कधीच काही लिहिणार नाही, प्लास्टिक चा कचरा इकडे तिकडे फेकणार नाही. आपण निसर्गाला जपूया, निसर्ग आपल्याला जपेल. पर्यटनाला येत असताना जबाबदारीचे भान ठेऊन जर स्वच्छता राखली तर तो इतरांसाठी आदर्श ठरेल.

अकोले तालुक्यामधे पर्यटन करताना मी कचरा करणार नाही व कोणाला करू देणार नाही हा संकल्प आपण सर्व जन करुयात. एक अकोलेकर म्हणुन मी आपल्या सर्वांचे शिस्तप्रिय पर्यटनासाठी अकोले तालुक्यात सहर्ष स्वागत करतो.

प्रिय महाराष्ट्र देशा, तुझ्या सौंदर्याचे, राकटतेचे, विविधतेचे, आम्ही सदैव ऋणी आहोत….आम्ही स्वतःची काळजी घेतो, आणि यापुढे तुजीही काळजी घेऊ.

हे वाचन देतो.

Leave a Comment

error: Content is protected !!