सहयाद्रीचे अनमोल रत्न ”रतनगड” | The Jewel Of Sahyadri’s “Ratangad”
आज आपण जाणार आहोत सहयाद्रीचे एक अनमोल रत्न अशी ओळख असलेल्या गडावर….कात्रीने कापल्याप्रमाणे डोंगरकड्यांनी आणि कात्राबाई खिंडीच्या शेजारी असणाऱ्या बुलंद,अतिशय देखणा, बलदंड, अवशेष संपन्न, घनदाट जंगलाने वेढलेल्या, आपल्या खांद्यावर ‘नेढे’ बाळगणाऱ्या ‘रतनगडावर’..अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील (Ratangad Fort District) अकोले तालुक्यात हा किल्ला आहे.
अहिल्यानगर (अहमदनगर)जिल्ह्याच्या पश्चिमेला हा तालुका वसलेला आहे. अकोले तालुका हा डोंगरदऱ्यांनी अतिशय समृद्ध असून या सह्याद्रीच्या रांगेत वसलेल्या अनेक दुर्ग रत्नांपैकी रतनगड(Ratangad) हा एक किल्ला आहे.
रतनगड(Ratangad) हा प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ला आहे..इतिहासकारांच्या मते हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला होता…हा किल्ला कळसुबाई- हरिश्चंद्रगड डोंगर रांगेत(Kalsubai-Harishchandragad Hill Range) वसलेला डोंगरी किल्ला आहे.
कळसुबाई– हरिश्चंद्रगड अभयारण्यामध्ये (Kalsubai-Harishchangragad Wildlife Sanctuary) भंडारदरा जलाशय, रतनवाडीतील अमरूतेश्वर मंदिर, अलंग-मदन-कुलंग हे दुर्गत्रिकुट, सांधण दरी, अशी अनेक ठिकाणे आहेत.
भंडारदरा परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे पाहणे हे खूप आनंददायी आहे. हा आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी या परिसरात येत असतात. परंतु आडवाटेवर दुर्गम ठिकाणी असलेल्या रतनगडावर मात्र काही मोजकेच भटके आणि हौशी ट्रेकर्स जातात. रतनगड आपली कसोटी पाहण्यात कसलीही कसूर करत नाही. शारिरीक क्षमता, इच्छा आणि वेळेचे नियोजन केल्यास रतनगडाची भेट संस्मरणीय अशी ठरेल. कळसुबाई शिखराच्या दक्षिणेला हा किल्ला वसलेला आहे. या रतनगडाजवळ प्रवरा नदीचा उगम होतो(Source Of River Pravara At Ratangad). या प्रवरा नदीवरच भंडारदरा हे धरण बांधलेले आहे.
जैवविविधतेच्या बाबतीत भारतातील अनेक महत्वाच्या ठिकाणांमध्ये रतनगड परिसराचा समावेश होतो. या गडावर जाण्यासाठी पायथ्याशी असलेल्या रतनवाडी(Ratangad Trek Base Village) या गावात पोहचायला हवे.
रतनगड हा समुद्रसपाटीपासून सुमारे 4,200 फुट उंचीवर आहे. रतनगडावर जाताना वाटेत घनदाट जंगल आहे.
गडावर पाण्याचे अनेक टाके आणि प्राचीन बांधकामाचे अवशेष पहायला मिळतात. रतनगडावरून चहुबाजुंचा मुलुख नजरेच्या टप्प्यात येतो.
रतनगडाला लागून असलेला कात्राबाई डोंगर, आजोबाचा डोंगर, दरम्यानच्या ऊंच आणि खोल दऱ्या उरात धडकी भरवतात, रतनगड कडेलोट येथून दिसणारा ऊंच सुळका (खुटटा) आपले लक्ष वेधून घेतो.
समोर अलंग-मदन-कुलंग(Alagn-Madan-Kulang) हे दुर्गत्रिकुट दिसतात तसेच कळसुबाईची सर्वोच्च पर्वत रांग दिसते. भंडारदरा जलाशयाचे विहंगम दृश्य दिसते, तसेच अनेक डोंगर, उतुंग कडे हे सारे पाहून आपण नि:शब्द होऊन जातो. 4,200 फुट उंचीवर असलेल्या रतनगडावरील सौंदर्य डोळ्यात साठविण्यासाठी ट्रेकर्स, भटक्यांची आणि पर्यटकांची सतत ये-जा सुरु असते.
सहयाद्रीच रांगडं रूप सह्याद्रीचा राकटपणा कातळकडे त्याचा कणखरपणा हे सर्व पहायचे असेल तर रतनगडाला भेट द्यायलाच हवी.
रतनगडाचा इतिहास | Ratangad Fort History
इ.स. 1818 साली रतनगड हा किल्ला पाच विभागांचे मुख्यालय होते. राजूरची 36 खेडी ही सह्याद्रीच्या वरची व सह्याद्रीच्या खालची सोकुर्ली या परगण्याची 60 खेडी.
रतनगड किल्ला हा 1600-1700 या शतकात मौल्यवाण वस्तू,दागिणे, रत्न ठेवण्यासाठीचे एक महत्वाचे ठिकाण होते. 1820 नंतर इंग्रजांनी हा गड ताब्यात घेतल्यावर गडावरील या वस्तु ताब्यात घेतल्या आणि गड दारुगोळा लावून पूर्ण नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कोकण दरवाजा हा बराचसा उध्वस्त झालेला आहे. तसेच पश्चिम घाटातील औषधी वनस्पती शोधण्याचे महत्वाचे ठिकाण म्हणूनही या गडाकडे पाहिले जायचं.
पुराणामध्ये असा ऊल्लेख आहे कि समुद्रमंथन झाल्यानंतर देव आणि दानव यांच्यात समुद्रातून निघालेल्या अमृताची वाटणी करण्याचे ठरले व नेवासे येथे देवांनी अमृत प्राशन केले त्याच देवांच्या पंक्तीत राहू नावाचा एक दानव असून त्यानेही अमृत प्राशन केल्याचे देवतांना समजताच विष्णूंनी मोहीनी रूप धारण करून त्या राहू दानवाचा शिरछेद केला त्यावेळी त्याचे शीर रतनगडावर पडले व त्याच्या कंठातील अमृताची धार गडावरुन वाहू लागली तेव्हां पासून त्या धारेचे नदीत रूपांतर झाले व नदीला अमृत वाहीनी असे नाव पडले(थोडक्यात इतिहास).
गडावर जाण्यासाठी वाटा | Routes To Ratangad
गडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत.
पहिली वाट रतनवाडी गावातून आहे.
दुसरी वाट साम्रद गावातून आहे. या वाटेने गडावर जाण्यासाठी रतनगड खुट्ट्याला वळसा घालून बरेच चालावे लागते, तीन तासांपेक्षाही अधीक वेळ लागतो.
तिसरी वाट कुमशेत गावातून आहे. तीनही वाटा ट्रेकर्स आणि दुर्ग प्रेमींना, भटक्यांना दमवणाऱ्या आहेत. रतनवाडीतून गडावर पोहचण्याकरिता 3 तास लागतात.
रतनगड ट्रेक अंतर | Ratangad Trek Distance
रतनवाडी गाव ते रतनगड किल्ला अंतर 7 किलोमीटर आहे.
भंडारदरा गावापासून मुतखेल-कोलटेंबे मार्गे 23 कि.मी. अंतर आहे.
शेंडी गावातून रतनवाडीला प्रवास हा भंडारदरा जलाशयाला वळसा घालून जातो. रतनवाडी हे आदिवासी बहुल लोकसंख्येचं छोटस गाव. रतनगड ट्रेकच्या पायथ्याच गाव (Ratangad Trek Base Village).
शेंडी-मुरशेत-पांजरे-उडदावने-घाटघर डॅम- साम्रद मार्गे 36 किलोमीटर अंतर आहे.
पुण्याहून 180 कि.मी. आणि मुंबईहून 183 कि.मी. अंतरावर आहे.
महाराष्ट्रातील ट्रेकिंगसाठी रतनगड हे अतिशय लोकप्रिय ठिकाण असून भंडारदरा पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
रतनगड ट्रेक सुरवात | Ratangad Trek Start
अमृतेश्वर मंदिरापासून प्रवरा नदी पात्राच्या दिशेने पाहिल्यास भव्य रतनगड हा किल्ला डोळयासमोर दिसतो. गडाच्या माथ्यावर असलेले नेढे पाहून ते सहज ओळखता येते. ट्रेक चा मार्ग हा गावाच्या मागे नदी किनाऱ्याने सुरु होतो. मार्गाच्या सुरवातीपासूनच प्रवरा नदीच्या किनाऱ्याने आपण पायवाटेने चालत जातो.
हि पायवाट सुरवातीला गावातील शेतातून जाते. प्रवरा नदी प्रवाहावर एक बंधारा बांधलेला आहे. या बंधाऱ्याजवळ पोहचेपर्यंत वाट बऱ्यापैकि सपाट आहे.
सुरवातीस एक सुंदर चढणीचा प्रदेश आहे जो चढताना दमायला होते.
जंगलातून जाणारा चढणीचा मार्ग कठीण आहे. या बंधाऱ्याच्या पाण्याची आणि आजुबाजूच्या जंगलाची सुंदर दृश्ये पाहण्यासारखी आहेत.
रतनगडावर जाणाऱ्या संपूर्ण पायवाटेवर बऱ्याच दगडांवर पांढऱ्या बाणांनी चिन्हांकित केलेली आहे, परंतु हि चिन्हे काहि ठिकाणी पुसली गेली आहेत. तरी स्थानिक लोकांच्या पाळीव जनावरांच्या (गाई-म्हशी) ये जा मुळे मुख्य मर्गावर अनेक पायवाटा फुटलेल्या आहेत.
अनेक वाटा असल्यामुळे तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रतनवाडी गावातून वाटाड्या किंवा गाईड सोबत घेतला तर उत्तम.
टेकडीच्या पायथ्याशी येईपर्यंत पायवाट थोडी सोपी आहे. गडाच्या समोर असलेल्या या छोट्या टेकडीवर चढून गेल्यावर आपण सपाट माथ्यावर पोहचतो.
येथुन पुढील पायवाट हि एका घनदाट जंगलात प्रवेश करते. हि पायवाट सोपी ते मध्यम चढणीची आहे. या जंगलातील झाडे खूप दाट असल्याने उन्हाळयातही पायवाट थंड आणि आल्हाददायक असते. कारवी, बेहडा, तेरडा,हिरडा ही काही झाडे या जंगलात दिसतात.
या ठिकाणी घनदाट जंगल आहे. स्थानिक गावकरी येथे शनिवारी आणि रविवारी चहा, मॅगी आणि लिंबू सरबताचे स्टॉल्स लावतात.
या ठिकाणाहून दोन मार्ग जातात.. त्यातील एक मार्ग हा कात्राबाई खिंडीमार्गे कुमशेत वरून हरिश्चंद्र गडावर जातो आणि दुसरा मार्ग रतनगडावर जातो.
दोन्ही मार्ग दाखवणारा एक फलक तेथे लावलेला आहे. उजवीकडे रतनगडाकडे चालत गेल्यावर घनदाट जंगलातून पंधरा ते विस मिनिटांची चढण लागते. हि चढण चढून गेल्यावर पहिली लोखंडी शिडी लागते. या लोखंडी शिडीच्या पायऱ्या चढताना काळजीपूर्वक चढावे कारण या पायऱ्या तीव्र उताराच्या आणि उंच आहेत.
पावसाळयात या पायऱ्या खूप निसरड्या झालेल्या असतात. या शिड्यांवर एका वेळी एकच व्यक्ती चढू शकते, तेंव्हा हळू आणि सावकाश चढा. तुमचे कॅमेरे आणि मोबाईल फोन बॅगेत ठेवा आणि पायऱ्या चढताना फोटो काढू नका…तोल जाण्याची शक्यता असते.
रतनगड प्रवेश | Ratangad Entry
आपण रतनवाडी मार्गे रतनगडावर गेलो तर गणेश दरवाज्यातूनगडावर प्रवेश करतो आणि साम्रदगावातून ट्रेक सुरु केला तर त्र्यंबक दरवाजाव्दारे गडावर पोहचतो.
पहिल्या दरवाज्यातून पुढे गेल्यावर उजवीकडे काही पावले चालत गेल्यावर दोन गुहा (लेण्या) आहेत.
रत्नाई देवी मंदिर | Ratnai Devi Temple
कड्यात कोरलेल्या एका गुहेमध्ये गडाची देवता रत्नाई देवीचा तांदळा आहे. कळसुबाई, कात्राबाई आणि रत्नाबाई या तिघी बहिणी होत्या आणि या तिघींचेही वास्तव्य या डोंगरांवर होते. म्हणून हे डोंगर त्यांच्या नावाने प्रसिध्द झाल्याची कथा या पसिरातील लोकमानसात रुजलेली आहे.
दुसरी गुहा मुक्काम करण्यासाठी योग्य आहे. या गुहेत 20 ते 30 जण राहू शकतात. या गुहेजवळ स्थानिक गावकरी शनिवारी रविवारी लिंबू सरबत इत्यादि विक्री करण्यासाठी बसलेले असतात.
रत्नाइदेवीचे दर्शन घेऊन आल्यावर पुढे दुसरा दरवाजा लागतो.. या दरवाजावर सुंदर असे कोरीव काम केलेले आहे.
रतनगड कडेलोट | Ratangad Kadelot
रतनगडाच्या पूर्वेकडील कडेलोट या ठिकाणाहून दिसणारे कात्राबाई डोंगराचे कातळकडे अगदी मन खिळवुन ठेवतात, त्याच्या उजवीकडे आजोबाचा विशाल पर्वत आपले लक्ष वेधून घेतो.
रतनगड राणीचा हुडा | Hooda of Ratangad Rani
पुढे गेल्यावर भग्न अवस्थेतील एक प्राचीन टेहळणी बुरुज पाहायला मिळतो. याला राणीचा हुडा असेही म्हणतात. याचा वापर त्या काळी आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी केला जात असे. या बुरुजा शेजारी एक पाण्याचे टाके आहे. येथे जवळच अजून काही पाण्याची टाकी आहेत.
प्रवरा नदी उगम | Source Of River Pravara
पुढे त्र्यंबक दरवाजाच्या दिशेने गेल्यावर पाण्याचे एक छोटेसे टाके लागते. इथे एक देव आहे. येथुनच प्रवरा नदीचा उगम झालेला आहे. डिसेंबर पर्यंत यातील पाणी पिण्यायोग्य असते.
रतनगड महादरवाजा | Ratangad Mahadarwaja | Trimbak Darwaja
येथून अजून पुढे गेल्यावर आपण महादरवाजा जवळ पोहचतो.. हा किल्याचा मुख्य दरवाजा असून यालाच त्र्यंबक दरवाजा किंवा साम्रद दरवाजा असे म्हणतात. या दरवाज्यातुन खाली उतरताना 20 ते 25 कातळात कोरलेल्या मोठया पायऱ्या आहेत.
(या महादरवाजाला सागवानाचा भव्य लाकडी दरवाजा सहयाद्री प्रतिष्ठाण तर्फे 31 जानेवारी 2021 या दिवशी बसवण्यात आलेला आहे.)
साम्रद गावाकडून आपण रतनगड ट्रेक सुरू केला तर रतनगड खुट्टा ला वळसा घालून दोन ते अडीच तासात आपण रतनगडावर त्र्यंबक दरवाजातून प्रवेश करतो.. त्रंत्र्यंबक दरवाजाची वाट अवघड आहे. कातळ भिंतीच्या कडेने चालत गेल्यावर दगडी पायऱ्यांजवळ आपण पोहचतो.
या दगडी पायऱ्या भल्या मोठया कातळात एकसारख्या कोरलेल्या आहेत. या पायऱ्या चढून गेल्यावर आपण कातळात कोरलेल्या त्र्यंबक दरवाजाजवळ पोहचतो. या प्रवेशव्दारात पहारेकऱ्यांना राहण्यासाठी केलेल्या देवडया आहेत… येथील पायऱ्या, देवडया आणि त्र्यंबक दरवाजा हे सर्व कातळामध्ये कोरलेले असुन त्र्यंबक दरवाजा हा विशाल स्वरूपाचा आहे. या अनामिक कारागिरांच्या कामाचं आणि त्यांच्या कल्पकतेच कौतुक करावं तेवढं कमील ठरेल. त्र्यंबक दरवाजावर दगडात शिल्प कोरलेली आहेत. हा दरवाजा काटकोनाच्या आकाराचा आहे.
संपूर्ण गड फिरण्यासाठी आपल्याला दोन तासांपेक्षाही अधिक वेळ लागतो. पावसाळयानंतर येथे खूप गवत वाढलेले असते ते आपल्या डोक्यापेक्षाही उंच असते. रतनगडावरुन दिसणारे कळसुबाई शिखर आपली नजर खिळवून ठेवते.
भाग 2
रतनगड पुष्पोत्सव | Ratangad FLOWER Festival
रतनगड नेढ