कळसुबाई ट्रेक | Kalsubai Sunrise Trek भाग २

भाग १ वाचण्यासाठी इथे Click करा

भाग २
Kalsubai Sunrise Trek
कळसुबाई शिखरावरून दिसणारी दृश्य | View From Kalsubai Peak

शिखरावर पोहचल्यावर आपल्याला कळसूबाई-हरिश्चंद्रगड पर्वतरांगांची विहंगम दृश्ये पाहायला मिळतात. विविध पर्वतीय किल्ले आणि सुंदर अशी  निसर्ग  दृश्ये पाहायला मिळतात. शिखरावरून खाली दिसणारा विस्तिर्ण भंडारदरा जलाशय (Bhandardara Dam) लक्ष वेधून घेतो.

Table of Contents

 

शिखरावरून दिसणारा चहू बाजूंचा परिसर आणि सृष्टीच सौंदर्य हे खूपच सुंदर अन  मनाला भारुन टाकणारे दिसते.येथील दृश्य पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल.

पूर्वेला औंढा, विश्रामगड, बितनगड, पश्चिमेला अलंग, मदनगड, कुलंग, रतनगड(Ratangad) (नैऋत्य) आणि दक्षिणेला  घनचक्कर, हरिश्चंद्रगड(Harishchandragad) दिसतो.

 

उत्तरेला रामसेज, हरिहरगड, ब्रह्मगिरी, अंजनेरी, घारगड, बहुला, त्रिंगलवाडी, कावनई असे डोंगर रांगेतील किल्ले दिसतात.

अनेक पर्वत आणि किल्ल्यांचे विस्मयकारक अन विहंगम दृश्य मनाला सुखावून जाते …हि सर्व दृश्ये पाहून क्षणभरासाठी शिखर चढुन आलेला थकव्याचा आपल्याला विसर पडतो….

Kalsubai Sunrise Trek
     कळसुबाई शिखरावरून दिसणारे सोनेरी सूर्योदयाचे भव्य दृश्य | Kalsubai Sunrise Trek

येथून दिसणारे सोनेरी सूर्योदयाचे भव्य दृश्य(kalsubai sunrise trek) पाहण्यासारखे आहे.

कळसुबाई शिखरावरून दिसणारे सूर्योदयाचे भव्य दृश्य | Magnificent view of Sunrise From Kalsubai Peak…हा फोटो अतुल अनंत मोरे (श्री कला) यांनी काढला आहे | This Photo was taken by Atul Anant More (Shri Kala)

येथे सर्वत्र थंड, शांत आणि ताजी हवा असते जी तुमच्या मनाला अन शरीराला ताजेतवाने करेल. माथ्यावरून दिसणारे सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे अखंड नजारे तुम्ही पाहू शकता. एक रोमांचक अनुभव घेण्यासाठी हे एक योग्य ठिकाण आहे. या ठिकाणाहून दिसणाऱ्या सौंदर्याचे वर्णन शब्दात करता येत नाही.

तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावरचा (kalsubai highest peak of maharashtra)  ट्रेक पूर्ण केल्यामुळे एक आनंददायी अनुभूती मिळेल.तो आनंद ,सुख अनुभवण्यासाठी तुम्हाला कळसुबाई शिखरावती यायलाच हवे. हे ठिकाण आयुष्यात एकदा तरी अनुभवायलाच हवे.

 

खाली उतरण्यासाठी दोन ते तीन तासांचा वेळ लागतो. बारी या पायथ्याच्या गावात जाण्यासाठी तुम्हाला हीच पायवाट उतरावी लागेल.

ट्रेकिंग साठी कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.

    कळसुबाई शिखरावरून दिसणारे सोनेरी सूर्यास्ताचे भव्य दृश्य | Magnificent View of Golden Sunset From Kalsubai Peak

पायथ्याकडील बारी या गावापासून कळसूबाई ट्रेकचे अंतर एकेरी ५.५ किमी आहे. कळसूबाई ट्रेकची वेळ एकेरी ३ ते ४ तास लागतात.

कळसुबाई ट्रेक पूर्ण करण्यासाठी लागणार वेळ | How much Time it Takes to Kalsubai | Kalsubai Trek Distance from base

पायथ्याकडील बारी (Base Village) या गावापासुन कळसुबाई ट्रेक चे अंतर एकेरी ५.५ किलो मीटर आहे. कळसुबाई ट्रेक ची वेळ एकेरी ३ ते ४ तास लागतात

साधारणपणे कळसूबाई ट्रेक पूर्ण करण्यासाठी ८ – १० तास लागतात. ट्रेकरच्या वेगावर अवलंबून.

कळसुबाई ट्रेकसाठी योग्य वेळ | Best Time to Visit Kalsubai Peak | Best Time For Kalsubai Peak

वर्षभर पर्यटक इथे येत असतात. मान्सून ट्रेक साठी जून ते ऑगस्ट आणि पुष्पोत्सव पाहायचा असेल तर सप्टेंबर ते ऑक्टोबर.

कळसुबाई ट्रेक काठीण्य पातळी | How Difficult is Kalsubai Trek | Kalsubai Trek Difficulty Level

मध्यम ते अवघड

ज्या ठीकाणी चढणे अवघड आहे अशा ठिकाणांवर लोखंडी रेलिंग, शिड्या आहेत. त्यामुळे लहाण मुल, तरुण आणि वयस्कर अशा सर्वांनाच कळसुबाई ट्रेक करणे शक्य आहे.

कळसुबाई नाईट ट्रेक | Kalsubai Night Trek

कळसुबाई नाईट ट्रेक साठी नोव्हेंबर ते मे हि योग्य वेळ आहे.

जून ते ऑगस्ट या महिन्यांत पाऊस आणि वारा खूप असतो त्यामुळे शिखरावर जाण्याचे धाडस करू नये.

कळसुबाई ट्रेक मुंबई पासून अतंर | Kalsubai Trek Distance From Mumbai

राज्य मार्ग 160 घोटी मार्गे लागणारा वेळ : 4 तास. अंतर 152 किलोमीटर

बाहुली डॅम मार्गे लागणारा वेळ : 4 तास 5मिनीटे. अंतर 155 किलोमीटर

कळसुबाई ट्रेक पुणे पासून अतंर | Kalsubai Trek Distance From Pune

राज्य मार्ग 60 लागणारा वेळ : 5 तास. अंतर 170 किलोमीटर.

कळसुबाई ट्रेक नागपूर पासून अतंर | Kalsubai Trek Distance From Nagpur

एकूण अंतर : नागपूर ते बारी 656 किलोमीटर. या मार्गाद्वारे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग. सर्वात जलद मार्ग.

नागपूर-बुरीबोटी-वर्धा-कारंजा-मेहकर-जालणा-छत्रपती संभाजी नगर-शिर्डि-सि न्नर-घोटी रोड-एसएमबीटी मेडीकल कॉलेज-धामणगाव-सर्वतिर्थ टाकेद-बारशिंगवे-वासाळी फाटा-बारी

कळसुबाई  ट्रेक नाशिक पासून अंतर | Kalsubai Trek Distance From Nashik

लागणारा वेळ 2 तास. अतंर 58 किलोमीटर.

कळसुबाई ट्रेक जवळचे रेल्वे स्टेशन | Kalsubai Trek Nearest Railway Station
कसारा रेल्वे स्टेशन | Kasara Railway Station

घोटी मार्गे लागणारा वेळ : 1 तास 20मिनीटे. अंतर 51.4  किलोमीटर

बाहुली डॅम मार्गे लागणारा वेळ : 1 तास 30 मिनीटे. अंतर 54.4 किलोमीटर.

नाशिक रेल्वे स्टेशन | Nashik Railway Station

लागणारा वेळ : 2 तास. अंतर 64 किलोमीटर.

ईगतपूरी रेल्वे स्टेशन | Igatpuri Railway Station

घोटी मार्गे लागणारा वेळ : 1 तास 6मिनीटे. अंतर 30.5  किलोमीटर

बाहुली डॅम मार्गे लागणारा वेळ : 2 तास. अंतर 36.7 किलोमीटर.

जवळची पर्यटन स्थळे | Tourist places near Kalsubai Peak | Tourist Places in Akole Taluka

कळसुबाई शिखरापासून जवळ असणाऱ्या पर्यटन स्थळांनाही आपण भेट देऊ शकता.

भंडारदरा | Bhandardara

येथील थंड हवामान,मनमोहक निसर्ग दृष्ये ,धबधबे,

भंडारदरा धरण | Bhandardara Dam

कळसुबाई शिखराच्या दक्षिणेस १६ किलोमीटर अंतरावर असलेले सुंदर जलाशय आहे. सुट्टीच्या दिवशी भेट देण्यासाठी सुंदर ठिकाण. वर्षभर कधीही  आपण इथे येऊ शकता.

सांधण दरी | Sandhan Valley

कळसुबाई शिखरापासूनचे अंतर ३२.४ किलो मीटर. महाराष्ट्राच्या पश्चिम घाट रांगेतील निसर्गाचं अनोखं आश्चर्य असलेली सांधण दरी

रतनगड | Ratangad

कळसुबाई शिखरापासूनचे अंतर २६. ८ किलो मीटर. फुलाचे विविध प्रकार अर्थात नयनरम्य पुष्पोत्सव पाहावयाचा असेल तर सप्टेंबर ऑक्टोबर महिण्यात रतनगडाला भेट द्यायलाच हवी.

रंधा धबधबा | Randha Falls

कळसुबाई शिखरापासूनचे अंतर १४. ६ किलो मीटर.प्रवरा नदीचे पाणी ५० फूट उंचीवरून खाली कोसळते .

जवळचे एम टी डी सि रिसॉर्ट | Near MTDC Resort

एम टी डी सि रिसॉर्ट शेंडी (भंडारदरा डॅम) येथे आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!