रतनगड पुष्पोत्सव | Ratangad FLOWER Festival

भाग 1 वाचण्यासाठी click करा. सह्याद्रीचे अनमोल रत्न रतनगड Jewel Of Sahyadri’s Ratangad

रतनगडावरील नेढ | Nedh on Ratangad Fort

त्र्यंबक दरवाजापासून थोडेसे वर चढुन गेल्यावर आपण नेढ्याजवळ पोहचतो.

नेढे म्हणजे काय?

नेढ रतनगडावरील सर्वोच्च ठीकाण आहे. गडाच्या कातळभिंतीत निसर्गनिर्मित नेढ आहे. उभ्या डोंगराला (कातळाला) आरपार नैसर्गिकिरित्या पडलेले छिद्र किंवा भगदाड आहे…त्याला नेढ असे म्हणतात. हे इतके मोठे आहे कि यात 15 ते 20 माणसे सहज उभे राहू शकतात.

visitakole.com-Ratangad-Nedh

निसर्गाची हि अनोखी किमया पाहून आपण थक्क होऊन जातो. येथे थंड वारा वाहत असतो…तो अंगावर घेत खूप छान वाटते. या नेढ्यातून वाहणाऱ्या वाऱ्याचा भन्नाट थरार अनुभवने खुपच वेगळा अनुभव देते. या ठिकाणी आपल्याला थांबूनच रहावे असे वाटते. रतनगड चढून आलेला थकवा काही क्षणासाठी आपण विसरतो.

या नेढ्यातून चहू बाजूंचा परीसर दिसतो. या नेढ्यातून एकाचवेळी अकोले तालुक्यातील आणि कोकणातील परिसर पाहाता येतो.

या ठिकाणाहून पाबरगड, घनचक्कर डोंगर, शिरपुंजे भैरवगड, कात्राबाई खिंड, आजोबा पर्वत, कळसुबाई, अलंग-मलंग-कुलंग हि शिखरे दिसताता.

नेढ्याच्या दुसऱ्या बाजून खाली गेल्यावर पाण्याचे टाके लागते. जेव्हा तुम्ही टाक्यात उतराल तेव्हा आत जाण्यासाठी एक गुहा मार्ग दिसेल आणि त्याच्या समोरच पाणी जाण्यासाठी दरवाजा सारखा मार्ग कोरलेला आहे. जेव्हा आपण यातून आत जाल तेव्हा सोबत उजेडासाठी बॅटरी असणे गरजेचे आहे. आत दोन गुहा असून यातील उजवीकडील गुहा रिकामी आहे आणि डावीकडील गुहेत टाक्यात तळाला भुयार आहे.या भुयाराच्या आत पिण्याच्या पाण्याचे कुंड आहे.

अजून थोडे पुढे चालत गेल्यावर पाण्याची सात टाके लागतात. जलस्थिरीकरणाची संकल्पणा इथे वापरलेली बघायला मिळते.

visitakole.com-sat-panyachi-taki

सात पाण्याची टाके यांची रचना अशी केली आहे कि एक टाक भरलं कि दुसर टाक भरायला सुरवात होते..अशी एका मागोमाग सातही टाके भरली जातात.

कल्याण दरवाजा कोकण दरवाजा | Kalyan Darwaja | Konkan Darwaja

सात पाण्याच्या टाक्यांपासून पुढे गेल्यावर चौथा दरवाजा कोकण दरवाजा किंवा कल्याण दरवाजा आहे. अर्धा बुजलेल्या अवस्थेतील हो दरवाजा गडावर येण्याचा अजून एक मार्ग आहे. परंतु, इंग्रजांनी येथे येण्याचा हा प्रवेशमार्ग पुर्णत: उध्वस्त केलेला आहे.

visitakole.com-kokan-darwaja-kalyan-arwaja.

या मार्गाणे गडावर येणे कठीण आहे.अतिशय सुबक असे हे प्रवेशव्दार असून त्या काळातील हे प्रमुख प्रवेशव्दार असावे. येथील बुरुजाच्या  भिंतीची बरीच पडझड झालेली आहे. हा दरवाजा सध्या उध्वस्त स्थितीत आहे. या दरवाजातून कोकणातील परिसराचा विहंगम निसर्ग पहायला मिळतो. या ठीकाणाहून आजोबा पर्वत दिसतो.

रतनगड ट्रेक भेट देण्याची उत्तम वेळ | Ratangad  Fort Trek Best Time To Visit

रतनगडावरील पुष्पोत्सव पहायचा असेल तर सप्टेंबर ते ऑक्टोबर हा सर्वोत्तम काळ आहे.

या काळात रतनगडावर विविध प्रकारची रंगिबि रंबगि फुले फुललेली असतात. विविध फुलपाखरे पहायला मिळतात आणि संपूर्ण रतनगड हा हिरव्यागार गवताने नटलेला असतो. ऑक्टोबर ते जानेवरी या काळातही आपण रतनगडावर जावू शकतो.

visitakole.com-Kokan-Darwajadun-Disnare-Sundar-Drushya

रतनगड पुष्पोत्सव | रतनगड कारवी महोत्सव | Ratangad Flower Festival Date
| Karvi | Ratangad Flower Season | Ratangad Flower Trek Distance

रतनगडावरील पुष्पोत्स हा पावसाळ्यात साधारणपणे ऑगस्ट पासून सुरू होतो. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर चे पहिले 15 दिवस या काळात हा नयनरम्य पुष्पोत्सव पहावयास मिळतो.  त्यावेळेस किल्ल्याभोवतीच्या टेकड्या विभिन्न रानफुलांनी झाकल्या जातात.

visitakole.com-Ratangad-Flower-Festival

या पुष्पोत्सवादरम्यान पर्यटक सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या सौंदर्याचे साक्षीदार होऊ शकतात आणि आजुबाजूच्या डोंगरांच्या नयणरम्य दृश्यांचा आनंद घेवू शकतात.

visitakole.com-Ratangad-Karvi-Flower-Festival

रतनगड फ्लावर फेस्टीवल हा निसर्ग आणि साहस प्रेमिंसाठी एक अमृत पर्वणीच असते आणि सह्याद्रीच्या सौंदर्याचा घ्यायचा असेल तर हा पुष्पोत्सव पहायलाच हवा.

रतनगडावर जाण्याचे मार्ग | Routes To Ratangad Fort 

रतनवाडी गावातून सर्वात सोपा मार्ग.

रतनवाडी मार्गे साम्रद या गावातूनही आपण रतनगड ट्रेक सुरू करू शकतो.

पुण्याहून संगमनेर जवळपास 145 किलोमीटर आहे आणि तेथून अकोले 24 किलोमीटर आहे. अकोले ते शेंडी(भंडारदरा डॅम) अंतर 44 किलोमीटर आहे.

रतनगडचा प्रवास हा शेंडी गावातून सुरू करावा मुरशेत गावातून रतनवाडीला जाण्यासाठी होड्या उपलब्ध असतात. या होड्यांद्वारे भंडारदरा धरणाचे बॅकवॉटर पार करून पहिल्या वाडीत आपण पोहचतो. येथुन पुढे अर्धा तास चालल्यावर आपण रतनवाडी गावात पोहचतो.

बरेच पर्यटक आणि भटके साम्रद (सांधण व्हॅली)–रतनगड–कात्राबाई खिंड–कुमशेत गाव–पेठेची वाडी–पाचनई गाव–हरिश्चंद्रगड असा ट्रेक देखील करतात.

रतनगडावरील प्रेक्षणीय ठीकाणे  | Place To Visit At Ratangad Fort
  • गणेश दरवाजा
  • रत्नाई देवीची गुहा (मंदिर)
  • मुक्कामाची गुहा
  • हनुमाण दरवाजा
  • जुण्या भग्न इमारतींचे अवशेष
  • कडेलोट पॉईंट
  • राणीचा हुडा किंवा भग्न बुरूज
  • प्रवरा नदीचे उगमस्थान
  • मोर्चाची ठिकाणे आणि टेहळणी बुरूज
  • अंधार कोठी व त्यातील पाण्याचे टाके (या टक्यातील पाणी अतिशय शितल आणि पिण्यास योग्य आहे.)
  • नेढ गडावरील सर्वात उंच ठिकाण खडकाला आरपार भगदाड पडलेले आहे.
  • कोकण दरवाजा किंवा कल्याण दरवाजा (या दरवाजाला महादरवाजा किंवा त्र्यंबक दरवाजा असेही म्हणतात.)
रतनगडावरील राहण्यासी सोय | Accommodation At Ratangad Fort

गरावर मुक्कासाठी दोन गुहा (लेण्या) आहेत. या गुहेत अंदाज 20 ते 30 माणसे राहु शकतात.

गडावर जेवणाची सोय उपलब्ध नाही. मुक्कामाच्या तयारीने रतनगड ट्रेक करत असाल तर स्वत: जेवण बणवण्याचे साहीत्य सोबत घेवून जावे.

गडावर पिण्या योग्य पाण्याची टाकी उपलब्ध आहेत. या टाक्यांतील पाणी सुमधुर आणि थंडगार असते.

रतनगडावर जाण्याच्या वाटा

रतनगडावर जाण्यासाठी 3 वाटा आहेत.

  1. रतनवाडी गावातून
  2. साम्रद गावातून
  3.  कुमशेत गावातून इंग्रजकालीन मार्ग
रतनगड पायथ्याला रतनवाडी गावात कसे पोहचाल? | How To Reach Ratanwadi a Village at the base of Ratangad Fort?

मुंबईहून–कसारा रेल्वे स्टेशन–इगतपुरी–घोटी–पिंपळगावमोर फाटा–बारी–वारंघुशी–शेंडी–मुरशेत–पांजरे–उडदावणे–साम्रद–रतनवाडी

पुण्याहून–आळेफाटा–संगमनेर–अकोले–राजूर–भंडारदरा–मुतखेल–कोलटेंबे–रतनवाडी

नाशिक–घोटी–पिंपळगावमोर फाटा–बारी–वारंघुशी–शेंडी–मुरशेत–पांजरे–उडदावणे–साम्रद–रतनवाडी नाशिक

रतनवाडी गावातून रतनगडावर पोहचण्यासाठी साधारण 3 तासांचा वेळ लागतो.

Leave a Comment

error: Content is protected !!